बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; किरीट सोमय्यांचं पवारांना खुलं आव्हान

मुंबई | आयकर विभागाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींवर केलेल्या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर काही गंभीर आरोप केले आहेत. तसेच यावेळी सोमय्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील काही सवाल करत याप्रकरणी असलेले पुरावे खोटे सिद्ध करण्याचं आव्हान केलं आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, जरंडेश्वर कारखान्यापासून 70 बेनामी संपत्तीत, कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे भागीदार आहेत. बहिणींच्या नावाने कंपन्यांमध्ये भागीदारी असून आपण म्हणता बहिणींचा काही संबंध नाही. मग अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईनामी केली की आपल्या बहिणींशी केली? आणि हे सर्व शरद पवारांना मान्य आहे का?

तसेच यासंबंधित माझ्याकडे असणारी सर्व कागदपत्रे मी आयकर विभागाला पाठवणार आहे. सहकार मंत्रालयाला देखील पाठवणार आहे. शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी यातील एक तरी कागद खोटा असल्याचं मला सिद्ध करुन दाखवावं, असं आव्हान सोमय्यांनी पवार कुटुंबियांना केलं आहे.

दरम्यान, मी महाराष्ट्रातील जनतेला जागृत करण्यासाठी हे सर्व करतोय. परंतु पवार कुटुंब महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचं काम करत आहे. ते लुटीसाठी करतात आणि मी त्यांनी केलेली लूट जनतेसमोर आणण्यासाठी काम करतो, असं देखील सोमय्यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सानिया मिर्झाचा मोठा निर्णय! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचं पुण्यात जल्लोषात स्वागत; पाहा व्हिडीओ

“बाळासाहेब ठाकरे खरे हिंदूवादी, राज ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते”

पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

…यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More