बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोटावर झोपल्यानं खरंच ॲाक्सिजनची पातळी वाढते का?; जाणून घ्या काय खरं

मुंबई | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक व्यक्ती हाताला ऑक्सिमीटर लावून पोटावर झोपला. त्यानंतर त्याची ऑक्सिजनची पातळी वाढू लागली. पण खरंच असं होत का ? की त्याचा ऑक्सिमीटर बिघडला असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पोटावर झोपल्याने किंवा अशा स्थितीत झोपल्याने खरंच शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते का? जर वाढत असेल तर यामागे नेमकं काय कारण आहे? हे जाणून घेऊयात.

पोटावर रुग्णाला झोपावून ऑक्सिजनची पातळी वाढवणं हे काही नवीन नाही. हा वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेला एक प्रयोग आहे. अशा पद्धतीने रुग्णाला झोपवल्याने ऑक्सिजनचा स्तर बदलतो, असं सेंटर फॉर क्रिटिकल केअरचे वरिष्ठ संचालक डॉ. राजेश पांडे यांनी सांगितलं आहे. ही वैज्ञानिक पद्धत डॉक्टर गेल्या दहा वर्षांपासून वापरत आहेत. कोरोनाआधी सामान्यपणे श्वास घ्यायला गंभीर त्रास होत असलेल्या किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी ही पद्धत वापरण्यात आली, असं डॉ. पांडे यांनी सांगितलं आहे.

आम्ही त्यांना अशा परिस्थितीत 16 तास पोटावर झोपवून ठेवतो. पण कोरोना महासाथीत सुरुवातीला असं केलं जात नव्हतं. आता कोरोना संकटात ऑक्सिजनची कमतरता असल्याने पोटावर झोपवणं ही आदर्श स्थिती बनवली आहे. यामुळे रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रित करता येऊ शकते, असंही डॉ. पांडे म्हणाले.

दरम्यान, ऑक्सिजन देण्याच्या दोन पद्धती असतात. एक तर आक्रमक व्हेंटेलेशन पद्धत आणि दुसरी म्हणजे बिगर इनवेसिव्ह व्हेंटिलेशन पद्धत जिथं मास्क लावला जातो. ज्या रुग्णांना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवलं जातं, तिथं ही पद्धत वापरली जाते. रुग्णालयात कमी स्टाफ आणि रुग्णांची जास्त संख्या यामुळे हे तसं अशक्यच आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

कडक लॉकडाऊनसंदर्भात तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे वाचा एकाच ठिकाणी

भारतात कोरोनाची स्थिती गंभीर, आम्ही मदत करण्यास तयार- चीन

‘सलाम पुणेकर’ म्हणत महापौरांनी पुणेकरांना सांगितली ही खुशखबर

ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनाने निधन!

‘त्या’ वृत्तावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण; महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More