बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनावरील लसीचा ‘DNA’ वर परिणाम होतो का? आरोग्यमंत्री म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नागरिकांमध्ये कोरोना लसीवरून निर्माण झालेल्या शंका केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दूर केल्या आहेत. कोरोनावरील लसीच्या  संदर्भातील सर्व शंका त्यांनी खोडून काढल्या आहेत. जगभरातील तज्ज्ञांचे विश्लेषण आणि संपूर्ण शास्त्रीय चाचण्यांनंतर लसीला मंजुरी दिली आहे. यामुळे लसीवर विश्वास ठेवा, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लोकसभेत यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

सरकारने मंजुरी दिलेल्या कोरोनावरील दोन लसींसंदर्भात देशातील नागरिकांनी मनात कुठलीही शंका ठेवू नये. संपूर्ण शास्त्रीय परीक्षण आणि संशोधनानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सरकारने लसी उपलब्ध केल्या आहेत. यामुळे नागरिकांनी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि सरकारी केंद्रांवर किंवा खासगी हॉस्पिटल्समध्ये जाऊन लस घ्यावी, असं हर्षवर्धन म्हणाले.

अनेक पातळ्यावंर आणि अनेक नागरिकांवर चाचण्या केल्यानंतर सरकारने कोरोनावरील लसींना मंजुरी दिली आहे. क्लिनकल चाचण्यांच्या निष्कर्षाच्या आधारावर आणि तज्ज्ञांच्या समित्या या लसींना मंजुरी देत असतात. लसीचा संपूर्ण जगात 7 ठिकाणांवर स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. त्यात फरीदाबादमधील जैवविज्ञान संस्थेचाही समावेश आहे, असं हर्षवर्धन यावेळी म्हणाले.

दरम्यान, देशात आतापर्यंत 3 ते 4 लाख कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी फक्त .०००४२३ टक्के विपरित परिणाम झाल्याची माहिती आहे. यामुळे मनात कुठलीही शंका न ठेवता नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडही पाहायचं नाही- ममता बॅनर्जी

महाराष्ट्र सरकारकडुन कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी; ‘हे’ आहेत नवे नियम!

‘कार ॲंड बाईक’चे 2021 चे पुरस्कार जाहीर, पाहा कोणत्या गाड्यांनी मारलीय बाजी

धक्कादायक! कोरोनाबाधित रूग्णाने हॉटेलवर जात दारू पिऊन केलं जेवण अन्…

शाब्बास रे पठ्ठ्या! सुवर्णपदक पटकावलेल्या अविनाशवर धनंजय मुंडेंची कौतुकाची थाप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More