मुंबई | महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कोर्टानं दोषी ठरवत 3 महिने तुरुंगवास आणि 15000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यावरुन आता भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता. पण खिसे गरम करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?, असं म्हणत चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केलीये.
दरम्यान, यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली असून भाजपने त्यांंच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.
गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री @AdvYashomatiINC यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 16, 2020
महत्वाच्या बातम्या-
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत तेजस ठाकरेंनी शोधली माशाची नवी प्रजाती
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आपल्यापेक्षा बरे- राहुल गांधी
संतापजनक! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला
एकनाथ खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले…