बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! 2021च्या सुरुवातीला लस घेतली त्यांना कोरोनाचा धोका अधिक

नवी दिल्ली | कोरोना महामारीपासून देश उभारत असतानाच पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर आणखी हैराण करुन सोडलं आहे. कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपानं तर चिंतेत भर पाडली आहे. अशातच आता कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण हे एकमेव शस्त्र असल्याचं दिसत आहे.

कोरोना लसीकरणासंदर्भात केलेल्या अभ्यासात आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्रायलनं केलेल्या अभ्यासातून 2021च्या सुरुवातीला ज्यांनी लस घेतली, त्यांना आता कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. ज्यांनी नंतर लस घेतली त्यांच्यामध्ये हा धोका कमी असल्याचं संशोधनातून आढळून आलं आहे.

आता तिसरा बूस्टर डोस देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. तो प्रभावी ठरेल का असा प्रश्न पडला आहे. लशीचे दोन डोस हॉस्पिटलायझेशन टाळण्यासाठी मदत करतात, हे स्पष्ट झालंय. तिसरा डोस घेतला तर तो प्रामुख्यानं विषाणू संसर्गाविरुद्ध शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करू शकतो.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या या बदलत्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे आता चिंतेत आणखी भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या – 

युती नाही पण समझोता! आगामी निवडणुकांसाठी भाजप-मनसेचं गणित ठरलं

‘माझ्या लग्नाची वरात एवढी मोठी काढली नाही’; जयंत पाटील भावूक

43 वर्षापूर्वीची गोष्ट आठवली अन् पठ्ठ्याला लागली 1448 कोटींची लाॅटरी

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की…”

‘लाच घेणं काही चुकीचं नाही, सगळीकडेच भ्रष्टाचार चालतो’; भाजप आमदार बरळल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More