बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का? अमोल कोल्हेंचं कवितेतून परखड भाष्य

मुंबई | देशात काल कोरोनाचे 3 लाख 62 हजारांहून अधिक नवे कोरआढळून आले व 4120 जणांचा मृत्यू झाला. बुधवारची आकडेवारी लक्षात घेता नव्या रुग्णांच्या संख्येत गुुरुवारी 14 हजारांनी वाढ झाली व मृतांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात 3 लाख 52 हजार रुग्ण बरे झाले. कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 37 लाखांपेक्षा अधिक झाली असून त्यातील 1 कोटी 97 लाख जण आजवर कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऑक्सिजनपासून व्हेंटिलेटर्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसत आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमधील अनेक दोषांसाठी सरकारची धोरणं जबाबदार असल्याचं सांगत सोशल नेटवर्किंगवरुन सरकावर निशाणा साधला जात आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

अमोल कोल्हे यांनी देशातील सद्यस्थितीवर कवितेच्या माध्यमातून परखड भाष्य केलं आहे. कोरोनामुळे देशभरातील परिस्थिती या व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे यांनी केला आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीत नवीन संसद भवन आणि पंतप्रधानांचे नवे निवासस्थान असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरुनही टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये दिल्लीत नवीन संसद भवन आणि पंतप्रधानांचे नवे निवासस्थान असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरुनही टीकास्त्र सोडलं आहे. तसेच देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का?, असा टोला देखील अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.


थोडक्यात बातम्या –  

सर्वात प्रभावी Sputnik V लशीची किंमत जाहीर, इतक्या रुपयांना मिळणार!

‘लव यू जिंदगी’ म्हणत ती धैर्यानं कोरोनाशी लढली, मात्र नियतीला काही वेगळंच हवं होतं!

‘या’ राज्यात पुन्हा मृत्यूचे थैमान! मध्यरात्री ऑक्सिजन संपला; 4 तासांत 13 रुग्णांचा मृत्यू

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

फेसबुकवरील मैत्रीनं घातला 2 लाखांचा गंडा; नंतर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More