पुणे महाराष्ट्र

क्रूरतेचा कळस! पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून ठार मारलं

पुणे | पिंपरी चिंचवडमध्ये एका भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. पिंपळे गुरव येथील चंद्ररंग कॉर्नर इमारतीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी फरीनजहाँ विशाल शेख यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेबाबत माहिती मिळताच खासदार मेनका गांधी यांनी सांगवी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली आणि एका संशयित आरोपीचं नाव निष्पन्न झालं.

दरम्यान, कुत्र्याला इमारतीवरून फेकणाऱ्या अज्ञाताला तातडीनं अटक करण्याच्या सूचना मेनका गांधी यांनी दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

आम्ही आरएसएसच्या हिंदू धर्मावर विश्वास ठेवत नाही- ममता बॅनर्जी

“नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार”

भाजप सोडून परत या, तिन्ही पक्ष मिळून निवडून आणू- अजित पवार

फेक टीआरपीप्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना जामीन!

…तर हे केंद्र सरकाराच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही- बाबा आढाव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या