कुत्र्यांनी उडवली लालूप्रसाद यादव यांची झोप; जेल बदलून देण्याची मागणी

पटणा | चारा घोटाळ्याबाबत शिक्षा भोगत असलेले आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची सध्या झोप उडाली आहे. लालूंची झोप उडण्याचं कारण कुत्रा आहे.

लालू यादव जेलमध्ये जेव्हा झोपण्य़ाचा प्रयत्न करतात तेव्हा कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे त्यांना झोप येत नाही. या कारणासाठी त्यांनी जेल बदलून देण्याची मागणीही केली आहे.

दरम्यान, राजकारणात अनेकांना झोपवणाऱ्या लालू यादवांची झोप मात्र आता कुत्र्यांनी उडवली आहे. लालूप्रसाद यादव यामुळे पेईंग वार्डची मागणी करत आहेत, असं लालूंचे समर्थक इरफान अन्सारी यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-हार्दिक पटेलच्या उपोषणाचा नववा दिवस, तयार केलं मृत्यूपत्र!

-नक्षलवाद्यांनी भाजप सरकार उलथवण्याचा कट रचल्याचे विधान मूर्खपणाचे- शिवसेना

-शिस्तीचा आग्रह धरणाऱ्यांवर आज हुकूमशाहीचा आरोप केला जातोय- मोदी

-झाडावरचे नारळ काढून इशांत लंबू झाला- सचिन तेंडुलकर

-मराठा तरुण अस्वस्थ; आणखी एकानं विहिरीत उडी मारुन जीव संपवला!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या