Top News विदेश

ब्राझीलच्या ह्युंदाईमध्ये Employee of the Year चक्क एका कुत्र्याने मिळवला…!

नवी दिल्ली | एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावला या घटनेपासून ते कुत्र्याने एखाद्याचा जीव वाचवला या घटनेपर्यंत आपण अनेक गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण एखाद्या कुत्र्याने पुरस्कार जिंकला आहे, असं तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ना. तर ही गोष्ट अगदी खरीखुरी आहे. विश्वास नाही बसत ना, मग पुढे वाचाच…!

ब्राझीलमध्ये Hyundai शोरूमच्या बाहेर सतत एक कुत्रा भटकत असायचा किंवा तिथे बसलेला असायचा. त्या कुत्र्याचे नाव टूसॉन (Tucson) आहे. ‘टूसॉन’ हा गल्लीमध्ये हिंडणारा एक कुत्रा होता. काही दिवसातच टूसॉनची Hyundai शोरूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी ओळख होऊन मित्रता झाली.

टूसॉन आणि कर्मचाऱ्यांची नात अगदी घट्ट झालं. त्यानंतर Hyundai तील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून टूसॉनला शोरूमचा एक कर्मचारी बनवले आणि एवढंच नाही तर त्याला त्याचे ओळख पत्रही देण्यात आले. बाकी कुत्र्यांप्रमाणे टूसॉन पहिलं Hyundai शोरूमची रखवाली करत होता. त्यानंतर त्याला कामात बढती मिळाली. तो कंपनीचा सेल्समन झाला म्हणजे सेल्सडॉग झाला.

Hyundai ने इन्स्टाग्राम खात्यावरून या नव्या सदस्याचा फोटो टाकला आहे आणि त्यात लिहिलंय,”या नव्या सदस्याचे वय १ वर्ष आहे. Hyundai परिवारामध्ये त्याचे स्वागत केले आहे आणि त्याचबरोबर त्याने आधीच कर्मचारी आणि ग्राहकांची मने जिंकली आहे.” माहितीनुसार टूसॉनचे इन्स्टाग्राम खाते आहे, त्याचे ७०,००० पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्ल्ड ऑफ बजच्या अहवालानुसार, टूसॉनला Hyundai ने २१ मे २०२० रोजी दत्तक घेतले आहे. टूसॉन हा ब्राझीलमधील Espirito Santo राज्यातील Serra येथील Hyundai शोरूममध्ये काम करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

कली पुरी यांना २०२० वर्षातील ‘सर्वात प्रभावशाली महिला’ पुरस्कार देऊन सन्मानित

एकनाथ खडसेंनाही वाढीव विजबिलाचा ‘शॉक’, एका महिन्याचं बिल तब्बल…..

आनंदाची बातमी! “कोरोनाच्या लसीच्या चाचण्यांना शंभर टक्के यश”

संशोधकांना मोठं यश; कोरोना संसर्गाचे ‘हे’ सहा प्रकार आणले समोर

कोरोनाच्या औषधाचा दावा अंगलट; न्यायालयाने ‘पतंजली’ला ठोठावला इतक्या लाखांचा दंड

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या