बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुत्री-माकडांचं टोळीयुद्ध संपलं! दहशत माजवणारी माकडं अखेर जेरबंद

बीड | बीडच्या लवूळ (Lavul) गावात भरदिवसांपासून माकडांची दहशत पहायला मिळत होती. (Dog-monkey gang war)  त्यामुळे ग्रामस्थांना घराच्या बाहेरही पडता येत नाही, अशी अवस्था झाली होती. या माकडांनी बीडमधील 150 हून अधिक कुत्र्यांचा जीव घेतला होता. त्यामुळे लवूळात मोठा गोंधळ उडाला होता. अशातच आता दहशत माजवणाऱ्या या माकडांना अखेर जेरबंद करण्यात आलं आहे.

परिसरातील काही कुत्र्यांनी एका माकडाच्या पिलांना मारलं होतं. यानंतर संतप्त माकडांच्या टोळीने या परिसरातील कुत्र्यांची हत्या करण्यास सुरुवात केली. आता या गावात कुत्र्याचं एकही पिल्लू उरले नाही, असं स्थानिकांनी सांगितलं आहे. त्यानंतर स्थानिकांनी वनविभागाला माहिती दिली.

उच्छाद मांडणाऱ्या माकडांबद्दल माहिती मिळताच वनविभागाची टीम कामाला लागली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या माकडांच्या टोळीतील दोन माकडांना पकडलं आहे. त्यांना नागपूरला हलविण्यात येणार असल्याची माहिती बीडचे वनविभागाचे अधिकारी सचिन कांड यांनी दिली आहे.

दरम्यान, पकडण्यात आलेल्या या माकडांना जंगलात सोडण्यात येणार असल्याचं देखील सचिन कांड यांनी सांगितलं आहे. दहशत माजवणाऱ्या या माकडांना पकडण्यात आल्यानं आता लवूळकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

“माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, मी ‘त्या’ नेत्यांसारखा नाही जे…”

“स्वत:ला मोठा नेता म्हणे, तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झालात”

“माझे 30-35 आमदार होऊ द्या, 10 मिनिटात गंमत करून दाखवतो”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक

भारतीयांसाठी धोक्याची घंटा! लसीकरण झालेल्या लोकांना ओमिक्राॅनचा धोका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More