Dolly Chai Wala | सोशल मीडियावर ‘डॉली की टपरी’ माहीत नसणारा क्वचितच सापडेल. नागपुरात चहा विकणारा हा चहावाला जगभरात प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या टपरीवर काही महिन्यांपूर्वी अब्जाधीश व्यक्ती आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक बिल गेट्स आले होते. यानंतर तर त्याचे नाव जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचले.
सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोवर्स आहेत. अशात डॉलीने एक नवीन व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये तो मालदीवमधील समुद्र किनारी चहा बनवताना दिसून येत आहे.
डॉलीचा मालदीवमधील व्हिडिओ व्हायरल
डॉलीचा हा व्हिडिओ आता वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. यावर नेटकरी प्रतिक्रिया नोंदवत आहेत. डॉलीने 16 जून रोजी त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यातून त्याची चहा आता जगभरात प्रसिद्ध झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये डॉली चहावाला (Dolly Chai Wala ) मालदीवमधील समुद्र किनारी चहा बनवताना दिसत आहे. त्यानंतर विदेशी पर्यटकांना तो चहा देताना दिसत आहे. त्याच्यासोबत बऱ्याच विदेशी व्यक्तींनी फोटो देखील काढले. डॉलीचा मालदीवमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
डॉलीने समुद्र किनारी बनवली चहा
डॉलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मालदीव वाइब्स कॅप्शन देऊन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याच्यावर हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच लाखो लाईक या पोस्टला आले आहेत. या व्हिडिओमुळे डॉलीच्या चहाची परदेशातही चर्चा असल्याचं दिसून येतंय.
View this post on Instagram
नारपूरमधील रहिवासी असणारा हा डॉली (Dolly Chai Wala ) त्याच्या चहा बनवण्याच्या स्टाईलमुळे प्रसिद्ध झाला आहे. अनेक दिग्गजांनी त्याने बनवलेल्या चहाचा स्वाद घेतला आहे. नागपुरात त्याची चहाची दुकान ‘डॉलीची टपरी’ नावाने प्रसिद्ध आहे.
News Title – Dolly Chai Wala Tea Stall In Maldives
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित पवार यांच्या एका ट्विटने पोलीस प्रशासन हललं, हजारो विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
प्रसिद्ध रिलस्टार सनी जाधववर बलात्काराचा आरोप; सोशल मीडियावर खळबळ
“दलित बुद्धांनो आता तरी शहाणे व्हा!”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
महिलांच्या ‘या’ सवयींमुळे पतीचं आयुष्य होतं बरबाद!
“तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर…”; आदित्य ठाकरेंना ‘या’ नेत्याचं खुलं आव्हान