Dombivli MIDC Explosion | डोंबिवलीच्या एमआयडीसीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन धुराचा मोठा लोट पसरला असल्याची माहिती समोर आली आहे. डोंबिवलीच्या फेज 2 मध्ये अंबर कंपनीत ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी अग्नीशामन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सुदैवाने याआगीमध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. (Dombivli MIDC Explosion)
डोंबिवली एमआयडीसी कंपनीत अग्नितांडव
या मोठ्या दुर्घटनेमुळे डोंबिवली एमआयडीसीत आगडोंग पसरला. अंबर कंपनीच्या आजूबाजूच्या कंपनीला याचा मोठा धोका निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी बचावकार्य देखील घटनास्थळी पोहोचलं आहे.
उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. सध्या डोंबिवलीमध्ये तापमानाचा पारा हा 42 अंशावर गेला आहे. अशा ठिकाणी अग्नीतांडव पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण ठेवण कठीण होऊन बसतं. स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्यात.
आगीची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. याचा विपरीत परिणाम हा काही घरांना झाला. शेजारच्या इमारतीच्या काचा फुटल्याची माहिती आता समोर आली आहे. (Dombivli MIDC Explosion)
कंपनीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अग्नीतांडव पाहायला मिळालं आहे. कंपनीला लागलेली आग ही इतर ठिकाणी पसरताना दिसत आहे. यामुळे कंपनीच्या अवतीभोवती असलेल्या इमारतींच्या काचा देखील फुटलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. आग विझवणे हे अग्नीशामन दलापुढे मोठं आव्हान होऊन बसलं आहे. (Dombivli MIDC Explosion)
आगीची भीषणता पाहून परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. ही आग दोन किमीपर्यंत पोहोचली आहे. तसेच डॉक्टरांचे पथक पोहोचलं असल्याचं सांगितलं आहे. कंपनीत फायर ऑडिट झाले नसल्यास मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Dombivli MIDC Explosion)
याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
या आगीच्या प्रकरणी एमआयडीसीकडून फायर ऑडिट केले गेले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. “रोज आग लागते, बातम्या दिसतात त्यानंतर विषय संपतो. परंतु ठोस उपाययोजना होताना दिसत नाही,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
News Title – Dombivli MIDC Explosion Update on Jitendra Awhad Statement
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यासारखंच जळगावमध्ये मर्सिडीजनं चौघांना चिरडलं, राजकारण्याचा मुलगा मोकाट?
“लग्नापूर्वी वर्षभर..”, आमिर खानच्या एक्स पत्नीचा धक्कादायक खुलासा
पुणे अपघातप्रकरणी विशाल अग्रवालची धक्कादायक कबुली!
ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंडचा अभिषेक बच्चनबाबत मोठा खुलासा!
“तरूण पिढी नारळ पाणी पिण्यासाठी जाते का?”, वसंत मोरे संतापले