सर्वसामान्यांना मोठा झटका! घरगुती गॅस पुन्हा महागला
मुंबई | वाढत्या महागाईमुळे सर्वासामान्यांचं कंबरडं मोडलं असताना घरगुती गॅसच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. घरगुती गॅससह व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर घरगुती वापराचा गॅस पुुन्हा एकदा महागल्याने सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे.
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरचे दर 1 हजार 3 रूपयांवर जाऊन पोहोचले. तर मुंबईत व्यावसायिक गॅसच्या किमती 2306 रूपये प्रति सिलेंडर झाल्या आहेत.
दरम्यान, गेल्या दोन आठवड्यात घरगुती गॅसच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. तर मागील काही दिवसांत घरगुती वापराचा गॅस तब्बल 53.50 रूपयांनी महागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत आहे.
थोडक्यात बातम्या-
राज कुंद्राला मोठा झटका, पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता
दीपाली सय्यद यांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं, म्हणाल्या…
‘या’ लोकांनी का घेऊ नये कोरोनाचा दुसरा बूस्टर डोस?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती
“पुरून उरेल तुम्हाला… चित्रा वाघ म्हणतात मला”
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना दिली महाविकास आघाडीत यायची ऑफर?, म्हणाले…
Comments are closed.