बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड ‘डोमिनोज’ कंपनीचा डेटा लिक; ग्राहकांची ‘ही ‘ माहिती डार्क वेबवर उपलब्ध

नवी दिल्ली | डार्क वेब या हॅकर्सच्या सर्चइंजिनवर डोमिनोजच्या  ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि कार्डची माहिती उघड झाल्याची बातमी समोर आली आहे. सुरक्षा तज्ञांच्या मते, 18 कोटी ऑर्डरचा डेटा डार्क वेबवर उपलब्ध आहे. यामध्ये सातत्याने डोमिनोजवर ऑर्डर मागवणाऱ्या ग्राहकांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे.

हॅकर्सने डोमिनोज कंपनीचा तब्बल 13 टीबीचा डेटा हॅक केला आहे. हॅकर्सकडे आता 18 कोटी ऑडर्सची माहिती असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात ग्राहकांचे फोन नंबर, ईमेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणुक होण्याची शक्यता आहे.

आपण वारंवार डोमिनोजवर ऑर्डर करत असल्यास आपला वैयक्तिक डेटा तेथे सापडण्याची शक्यता असते. लीक झालेल्या माहितीमध्ये नाव, ईमेल, फोन नंबर आणि वापरकर्त्यांच्या जीपीएस स्थानाचा समावेश आहे. मात्र डोमिनोज इंडियानं मात्र आमच्या युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डेटा लीक झाला नसल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, डोमिनोज ही सर्वात लोकप्रिय खाद्य सेवा कंपनी आहे.जी जुबिलंट फूडवर्क्सच्या मालकीची आहे. बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यासह  285 पेक्षा जास्त शहरे आणि इतर देशांमध्ये डोमिनोजचे आउटलेट्स आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘मोदी लाईव्ह येऊन रडणार’; ‘या’ खासदाराची भविष्यवाणी ठरली खरी, पाहा व्हिडीओ 

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

लातूरच्या भूकंपामध्ये शरद पवारांनी केलेल्या त्या कृतीचं उदाहरण देत चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

#सकारात्मक_बातमी! देशभर कोरोनाचा हाहाकार मात्र पुणे जिल्ह्याच्या ‘या’ तालुक्यातील 9 गावांत कोरोना नावालाही नाही 

आनंदाची बातमी! देशातील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण 87.76 टक्क्यांवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More