Top News औरंगाबाद राजकारण

दानवेंचा जावई असा उल्लेख करू नका, आमचा आता कोणताही संबंध नाही- हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा सध्या एक व्हिडीयो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच वायरल झालाय. या व्हिडीयोमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी ‘यापुढे माझा उल्लेख रावसाहेब दानवे यांचा जावई असा कृपया करू नये. माझा आणि त्यांचा आता कुठलाह संबंध उरलेला नाही’ असं म्हटलंय.

“वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टी चव्हाट्यावर आणू नये हे जरी खरे असले तरी माझी परिस्थिती जरा वेगळी आहे. मी आणि माझी पत्नी संजना जाधव आम्ही दोघे सामाजिक, राजकीय जीवनात वावरत असल्याने काही गोष्टींचा खुलासा होणे गरजेचे आहे. मी घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे माझा उल्लेख यापुढे रावसाहेब दानवे यांचा जावई असा कृपया करू नये.” असं हर्षवर्धन जाधव यांचं म्हणणं आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी यापुर्वीही सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ जारी करत आपले कौटुंबिक वाद सार्वजनिक केले होते. सासऱ्यांकडून आपल्याला धमक्या, त्रास दिला जात असल्यापासून आत्महत्येस प्रवृत्त केले जात असल्या सारखे गंभीर आरोप जाधव यांनी केले होते.

या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव म्हणतात, “मी डिप्रेशनमधून बाहेर येऊन नव्या जोमाने सामाजिक कामाला लागलोय. गेली काही महिने माझ्यासाठी खूप कठीण गेली आहेत. मला धमक्या आल्या, पण या सगळ्यामधून मी बाहेर पडलो. मात्र अद्यापही मला त्रास देणं सुरूये. त्यामुळे मी घटस्फोटाचा निर्णय घेऊन तशी याचिका देखील न्यायालयात दाखल केलीये. यामुळेच माझा आता पत्नी आणि सासऱ्यांशी कुठालाही संबंध उरलेला नाही. तेव्हा दानवेंचा जावई किंवा संजनाचा पती असा माझा उल्लेख कुणीही करू नये.”

मधल्या काळात हर्षवर्धन जाधव राजकारणातून काही काळ दूर होते. “राजकारणातून संन्यास घेण्याचा आणि पत्नीला राजकीय वारस ठरवण्याचा निर्णय देखील मी आता रद्द केला आहे. भविष्यात राजकारणात कुठली दिशा घ्यायची हे मी वेळ आल्यावर ठरवेन. या संपुर्ण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंग आणि संकटाला खंबीरपणे तोंड देण्याचा माझा निर्धार आहे,” असं जाधव यांनी स्पष्ट केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

पुढच्या 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामान खात्याकडून इशारा, ‘या’ भागात होणार मुसळधार पाऊस

MPSC ची 20 सप्टेंबरची परीक्षा ‘येथे’ होणार, पटोलेंच्या सूचनेची अंमलबजावणी होणार

पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या