Top News

‘भारत विषारी वायू सोडणारा देश’; डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर टीका

वॉशिंग्टन | भारत हा विषारी वायू सोडणारा देश असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

बेलमॉन्ट विश्वविद्यालयात राष्ट्राध्यक्षपदासाठी सुरु असलेल्या निवडणुकीच्या शेवटच्या अध्यक्षीय वादविवादात ट्रम्प यांनी ही टीका केली आहे.

भारत, रशिया आणि चीन हे आपल्या देशातील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करताना दिसत नाहीत. त्याउलट अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करणारा देश असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

गेल्या 35 वर्षाच्या तुलनेत आपल्या नेतृत्वात कार्बन उत्सर्जनाची स्थिती सर्वात चांगली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. आम्हाला अब्ज रुपये खर्च करायचे होते आणि आमच्याशी भेदभाव केला जात होता म्हणून आम्ही पॅरिस करारातून बाहेर पडलो, असंही ट्रम्प यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

“एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल

‘एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो’; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका

‘दलबदलूंना प्रामाणिकपणा काय समजणार?’; अमृता फडणवीस आणि प्रियांका चर्तुर्वेदींमध्ये जुंपली

‘…तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते’; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या