कोलकाता | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराची प्रशंसा डोनाल्ड ट्रंम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी केली होती, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. ते पश्चिम बंगाल मधील सभेला संबोधित करत होते.
2016 साली अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत आम्ही नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणं राज्यकारभार करणार असल्याचं डोनाल्ड ट्रंम्प म्हणाले होते, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
शारदा चिट फंड घोटाळ्यात भ्रष्टाचारी पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी करत आहेत, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी योगी आदित्यनाथांच्या सभेला परवानगी नाकारल्यामुळं त्यांनी फोनवरून सभेला संबोधित केलं.
महत्वाच्या बातम्या-
–…यांना विकास नको फक्त सत्ता पाहिजे- देवेंद्र फडणवीस
–भाजप शिवसेनेच्या युतीचा निर्णय ‘या’ तीन जागांमुळं अडला?
–तोडपाणीचा आरोप असेल तर तो सिद्ध करा; धनंजय मुंडेंचं राज्य सरकराला आव्हान
–जन्म देण्याआधी संमती घेतली नाही म्हणून आई-वडिलांविरुद्ध कोर्टात जाणार!
–दिल्ली ठरलं स्वामीनाथन आयोग लागू करणार पहिलं राज्य