महाराष्ट्र मुंबई

“डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही”

मुंबई | अमेरिकेत जनमताचा कौल अमान्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन संकल्पनेचा, लोकशाहीचा अवमान केला आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय.

डोनाल्ड ट्रम्प यांना स्वत:ला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत आम्हाला आदर होता मात्र त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव मान्य न करता पदावर राहण्याची केलेली कृती लोकशाही विरोधी आणि रिपब्लिकन प्रतीमेला काळिमा फासणारी आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केलीये.

अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांनी काल धुडगूस घातला. तो प्रकार अत्यंत निषेधार्ह आणि लोकशाही विरोधी आहे, असं आठवले म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

KGF 2 चा टीझर वेळेच्या आधीच रिलीज; रचला नवा रेकाॅर्ड, पाहा व्हिडीओ

लॉजवर पाॅर्न पाहून सेक्स पोझिशन करताना गळफास लागला; तरुणाचा जागीच मृत्यू!

“सरकारी ट्विटर हॅंडलवर सरकारनं संभाजी महाराजांचं नाव वापरणं हा गुन्हा आहे का?”

“भाजपचे सत्ताधिकारी पदाधिकारी तेव्हा झोपले होते का?”

आयुक्तांनी उचलला पोलिसांना फिट ठेवण्याचा विडा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या