बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनाही भारतीय संस्कृतीचा अंगीकार करावा लागला!

मुंबई |  कोरोनाच्या सावटाखाली सगळं जग वावरत आहे. कोरोनाचे रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घ्यायला सुरूवात केली आहे. याला खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तरी कसे अपवाद असतील! त्यांनीही पाहुण्यांचा आदर करत आणि भारतीय संस्कृतीचा अंगीकार करत आर्यलंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांना नमस्कार केला.

कोरोनाच्या विळख्यातून बचावासाठी अनेक जण हँडशेक न करता नमस्कार करताना दिसून येत आहेत. अनेक जण शक्य होईल तेवढं शारिरिक अंतर ठेऊन आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीही हँडशेक न करता नमस्कार करत कोरनाविषयी जनजागृती केली आहे.

आर्यलंडचे पंतप्रधान लिओ वराडकर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. लिओ वराडकर हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. महाराष्ट्रातल्या कोकणातलं मालवण हे त्यांचं मूळ गाव. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी वराडकरांना नमस्कार करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ देखील नमस्कार करण्याचं वारंवार सांगत आहेत. विविध देशांच्या प्रमुखांनीही एकमेकांना नमस्कार करत कोरोनाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“आदित्यसाहेबांना खासदारकीसाठी मी नाही आवडलो त्यांची चॉईस त्या बाईला”

कोरोनाबद्दल सर्वकाही; IMA कडून महत्त्वाची माहिती जारी

महत्त्वाच्या बातम्या-

खुशखबर… तर पेट्रोल 70 रूपयांपर्यंत खाली येणार!

आंबेडकरांच्या ग्रंथाचा दाखला देत ओबींसीची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; कोल्हेंची मागणी

मुलांच्या वार्षिक परीक्षांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More