नरेंद्र मोदींचं नाव ऐकताच डोनाल्ड ट्रम्प थबकले, मात्र…

दावोस | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वर्ल़्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी दावोसमध्ये दाखल झालेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव ऐकताच ते थबकले, मात्र हवामान बदलावर प्रश्न असल्यानं त्यांनी काढता पाय घेतला.

एनडीटीव्हीच्या प्रतिनिधीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हवामान बदलावरील भूमिकेसंदर्भात ट्रम्प यांना प्रश्न विचारला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव ऐकताच ट्रम्प थोडा वेळ थबकले. मात्र पूर्ण प्रश्न लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यावर उत्तर देणं टाळलं. 

दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण होणार आहे. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हाच त्यांचा या भाषणात नारा असण्याची शक्यता आहे.