रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
नवी दिल्ली | रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर (Ukraine) लष्करी हल्ल्याचे आदेश दिले आणि रशिया-युक्रेन युद्धाची सुरूवात झाली. दोन आठवडे उलटून गेले तरी युद्ध सुरूच आहे. रशियाकडून (Russia) होणारे बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले, गोळीबार यामुळे युक्रेन हदरलं आहे. तर दिवसेंदिवस रशिया हे हल्ले तीव्र करत आहे.
रशियाकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील परिस्थिती भयावह झाली आहे. युक्रेन सैन्यासह शेकडो सामान्य नागरिकांनीही या युद्धात जीव गमावला. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर रशियाने कधीच युक्रेनवर हल्ला केला नसता, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं. मला वाटले की पुतिन सैन्य पाठवून युक्रेनवर दबाव आणुन करार करू इच्छित आहेत. पण रशियाने युक्रेनवर हल्ला केला. पुतिन खूप बदलले आहेत आणि ही जगासाठी दु:खाची बाब आहे, असं ट्रम्प एका मुलाखतीत बोलताना म्हणाले.
दरम्यान, युक्रेनच्या सीमेवर सैन्य पाठवणे हा करार करण्याचा एक स्मार्ट मार्ग आहे. मात्र, रशियाने युक्रेनवर हल्ला केला. आपल्या काळात आपण रशियाबाबत खूप कठोर होतो, असं वक्तव्य देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! राज्यातील शिक्षकांसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी
पेमेंट वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यानं लढवली अनोखी शक्कल, ऑफिसमध्येच केलं ‘हे’ काम
‘माझ्यासारखे सेक्सी कपडे घालतात ते…’; नीना गुप्तांनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
कोरोनाविषयी अजित पवारांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…
Comments are closed.