डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला म्हणतात, भारतावर पुन्हा हल्ला केला तर तुमचं अवघड होईल…

वाॅशिंग्टन | भारतामध्ये आता पुन्हा हल्ला झाला तर खूपच अवघड परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात शाश्वत आणि ठोस कारवाई करावी, असंही अमेरिकेने सांगितलं आहे.  

पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात ठोस पावले उचलेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. विशेषत: जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या संघटना पुन्हा काही तणाव निर्माण करणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असंही अमेरिकेनं सांगितलं आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायूदलाने पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक केला होता. त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. 

दरम्यान, भारतीय वायूदलाने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावले होते.  

महत्वाच्या बातम्या-

-ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादी खेळतीय एकत्र होळी… ते ही मनसे कार्यालयात!

NSSO ने मोदी सरकारचा बुरखा फाडला! 5 वर्षात 2 कोटी पुरूष बेरोजगार झाले….

राष्ट्रवादी भाजपला म्हणते, आपला पाळणा कधी हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार…?

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

-नवनीत राणा अमरावतीतून लढणार, स्वत: पवार प्रचाराला येणार