वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना लागण झाली असून त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान ट्रम्प यांनी स्वतःचा एक व्हिडीयो सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
या व्हिडीयोमध्ये ट्रम्प म्हणतात, आता माझी प्रकृती चांगली आहे. सर्व योग्य रितीने पार पडतील असा मला विश्वास आहे. त्याचप्रमाणे मला या काळात पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
ट्रम्प यांनी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
कूल कॅप्टन केन विलियम्सन भर मैदानात भडकतो तेव्हा…
“माझा मुलगा दोषी असेल, तर त्याला सगळ्यांसमोर गोळ्या घाला पण…”
“हाथरस प्रकरणातील तरुणीची तिच्या आई आणि भावानेच हत्या केली, ते चारही युवक निर्दोष”
“योगीजी मी तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहे, माझं ऐका, पीडितांना भेटू द्या”