बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डोनाल्ड ट्रम्प झाले ‘बाहुबली’; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: शेअर केला व्हिडीओ

नवी दिल्ली | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत भेटीवर येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

व्हिडीओमध्ये डोनाल्ड ट्रम्प चक्क बाहुबलीच्या रुपात दिसत आहेत. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. भारतातील खास मित्रांना भेटण्यासाठी मी इच्छूक आहे, असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही दिसत असून ते ट्रम्प यांचं स्वागत करताना दिसत आहेत. ट्रम्पसोबत भारत भेटीवर येणाऱ्या पत्नी मेलानीया ट्रम्प, मुलगी इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनेर हेही व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

दरम्यान, मोदींचा अमेरिकेत ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम झाला होता. तसाच अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यावेळी ट्रम्प भारतीयांना संबोधित करतील.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मी एकवेळ जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही- नितीन गडकरी

मोदींनी पाठ थोपाटून विचारलं काय मंत्रीजी कसं काय चाललंय??- आदित्य ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

…अखेर महाराजांनी मागितली तृप्ती देसाईंची माफी

सीएए: बाबासाहेबांनी घटनेत जे लिहून ठेवलंय तेच आम्ही करत आहोत- नितीन गडकरी

‘भारत माता की जय’चा वापर उग्र राष्ट्रवादासाठी होतोय; मनमोहन सिंग यांचं भाजपवर टीकास्त्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More