Top News

जगात पहिला क्रमांक माझा, त्यानंतर मोदींचा; डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट

Loading...

नवी दिल्ली | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत भेटीवर येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्वीटमध्ये ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा उल्लेख केला आहे.

मार्क झुकरबर्गने काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, डोनाल्ड ट्रम्प फेसबुकवर पहिल्या क्रमांकावर आहेत, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर. मी काही दिवसांनी भारतभेटीला जात आहे. यासाठी मी उत्सुक आहे, असं ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Loading...

डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर येण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. ट्रम्प यांनीही भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. मोदींचा अमेरिकेत ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम झाला होता. तसाच अहमदाबादमध्ये ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यावेळी ट्रम्प भारतीयांना संबोधित करतील.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

इंदुरीकर महाराजांना वाढता पाठिंबा; सोशल मीडियात #ISupportIndurikarMaharaj

Loading...

गद्दारांना पक्षात स्थान नाही, दोन दिवसांत हकालपट्टी करणार- राज ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

इंदुरीकरांची बदनामी करणं पडलं महागात; गुन्हा दाखल!

शेतकऱ्यांनो काळजी करू नका, आता सरकार तुमचं आहे- मुख्यमंत्री

शाहीद आफ्रिदीला पाचव्यांदा कन्यारत्न; नेटकऱ्यांनी दिला ‘हा’ सल्ला

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या