विदेश

‘मास्क लावणारे लोक …’; डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मास्क लावणारे लोक नेहमीच कोरोनाग्रस्त असतात, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं केलं आहे.

मियामी या ठिकाणी एनबीसी न्यूजचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली होती. मात्र यातून ते बरे झाले.

26 सप्टेंबरला व्हाइट हाउसमध्ये एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे ट्रम्प यांना कोरोना झाल्याचं म्हटलं जातं आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क लावले नव्हते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतरही आता नेहमी मास्क घालणारे लोक कोरोनाग्रस्त असतात असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मुलाचे छंद जोपासायचे सोडून द्या अन् महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या”

“यशोमती ठाकूर यांना सत्तेचा माज आहे, त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही”

ड्रग्ज प्रकरणी विवेक ऑबेरॉयच्या पत्नीला क्राईम ब्रांचने पाठवली नोटीस

पुण्यात 28 वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकराला केलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या