बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींच्या नेतृत्वात भारत गरीबीतून बाहेर पडतोय- डोनाल्ड ट्रम्प

अहमदाबाद | मोदी यांनी चहावाला ते भारताचा पंतप्रधान असा प्रवास केलाय. मोदी म्हणजे कठोर कष्टाचं आणि मेहनतीचं उदाहरण आहे. मोदींच्या नेतृत्वात भारत वेगानं पुढे जातोय. मोदींच्या नेतृत्वामुळे भारत गरीबीतून बाहेर पडतोय, असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केलंय.

अमेरिका नेहमीच भारताचा विश्वासू आणि प्रामाणिक मित्र राहील, नेत्रदीपक स्वागताबद्दल धन्यवाद, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. ते अहमदाबादमधील मोटोरा स्टेडिययममध्ये बोलत होते.

पंतप्रधान मोदी तुम्ही फक्त गुजरातचा अभिमान नाही, तर कठोर परिश्रम आणि निष्ठेने भारतीय नागरिक काहीही करु शकतात, जे हवे ते साध्य करु शकतात, याचं तुम्ही जिवंत उदाहरण आहात. पंतप्रधान हे यांचा प्रवास हेलावणारा आहे, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.

दरम्यान, जुलमाने उदयास येणारे राष्ट्र आणि जनतेला मोकळीक देऊन उभे राहिलेले राष्ट्र – यामध्ये फरक आहे, हा भारत आहे, असं ट्रम्प यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या- 

‘या’ विभागांना 5 दिवसांचा आठवडा लागू नाही!

साबरमती आश्रमात ट्रम्प दाम्पत्यानी केली सूत कताई!

महत्वाच्या बातम्या- 

महाविकास आघाडीने अजित पवारांकडे सोपवली आणखी एक महत्वाची जबाबदारी

दहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिननं घडवला होता सर्वोच्च इतिहास

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More