बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलांमधील ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; बालरोग तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

मुंबई | कोरोना महामारीनं सर्वत्र थैमान घातलं आहे. पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेतही अनेकांनी जीव गमावले आहेत. कोरोनाची तिसरी संभाव्य लाट अधिक तीव्र असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचं प्रमाण अधिक असणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बालरोग तज्ज्ञांशी चर्चा करुन स्वतंत्र टास्क फोर्स उभारण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचं आहे.

कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे उलटत चालली आहे. गेल्या वर्षी, बहुतेक मुले असिम्पटोमॅटिक होती, म्हणजेच त्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत नव्हती. तर यावर्षी मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, प्रथम लक्षणं ही मुलांमध्ये दिसून येत आहेत आणि संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत आहे. म्हणूनच जर आपल्याला लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. असा सल्ला मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष राव यांनी दिला आहे.

ताप, सर्दी आणि खोकला, कोरडा खोकला, जुलाब, उलटी होणे, भूक न लागणे, जेवण नीट न जेवणे, थकवा जाणवणे, शरीरावर पुरळ उठणे,श्वास घेताना अडचण जाणवणे ही लक्षणं दिसल्यावर त्वरित तपासणी करून घ्यावी, असा सल्ला देखील डॉ. सुभाष राव यांनी दिला आहे. दुसऱ्या लाटेप्रमाणे तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं महत्वाचं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका अलर्ट मोडवर आहे. पुण्यात देशातील पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात 200 बेडचं हे चाईल्ड केअर हॉस्पिटल उभारले जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आमच्यावर विश्वास ठेवा, कोरोना धोरण आखण्यात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही- केंद्र सरकार  

मुलाची कैफियत ऐकल्यानंतर अजित पवार झाले भावुक; एक फोन फिरवला अन्…

…तर भाजप आमदाराला चपलीनं मारू; भाजप प्रवक्त्याची भाजप आमदाराला धमकी

एका आठवड्यात 5 वेळा इंधन दरवाढ; पेट्रोल पुन्हा शंभरी पार?

‘ग्रामीण भागात लस मिळेना’; शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More