पुणे | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना यंदाही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर येऊ देऊ नका, अशी मागणी पालखी समितीने केली आहे. या संदर्भात पालखी समितीकडून पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे.
संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांनी संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे चालत येणार नाही, असं बजावलं आहे.
दोन वर्षांपूर्वी तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली होती. भिडेंच्या कार्यकर्त्यांनी दिंडीच्या पुढे जाऊन मार्गक्रमण केलं होतं. यावरच दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतला होता.
दरम्यान, गेल्यावर्षी देखील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्यात घुसण्यास विरोध केला गेला होता.
महत्वाच्या बातम्या
-मुस्लिमांवरील हल्ल्याने आंबेडकर संतापले; ‘सरकारनेच मॉब लिंचिंग करण्याचे खुले परवाने दिलेत’
-अल्लाहू अकबर असो वा जय श्रीराम असो… संसदेत घोषणाबाजी नको- प्रकाश आंबेडकर
-विधानपरिषदेला मिळाल्या पहिल्या महिला उपसभापती; नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड
-94 टक्के पडूनही आत्महत्या केलेल्या मुलाच्या घरी जाऊन खा. संभाजीराजे रडले
-रायगडाला पुन्हा राजधानीचा दर्जा द्या; अमोल कोल्हे यांची गर्जना
Comments are closed.