बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आता माघार नाहीच’; शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह 14 पक्ष एकवटले

मुंबई | पेगसॅस फोन टॅप प्रकरणामुळे देशातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणावरून संसदेत गदारोळ झालेला पाहायला मिळतोय. इस्त्राईलच्या पेगसॅस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा छडा फाॅरेन्सिक तपासातून झाल्याचा खळबळजनक दावा ‘द वायर’ या वृत्तसंस्थेसह जगभरातील 15 मीडिया संस्थांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्ष आक्रमक झालेले दिसत आहेत.

आज दिल्लीत विरोधीपक्षांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला 14 पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत पेगसॅस प्रकरणावर चर्चा घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर सरकारला 10 दिवसांची नोटीस देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर त्या नोटीसवर राहुल गांधी सही करणार असल्याचं देखील ठरलं आहे.

दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, डीएमके, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल काॅन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळ काँग्रेस आणि वीसीके पार्टीचे नेते उपस्थित होते. पेगॅसस प्रकरणावर आता विरोधीपक्ष आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी संसदेत आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पेगॅसस प्रकरणाची इतर देशात चौकशी होते, तर भारतात का होत नाही?, असा सवाल काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मी काय राज कुंद्रा आहे का?’; राज ठाकरेंच्या वक्तव्यानं पिकला हशा

‘कोण काय बोलतंय त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही’; राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

“शरद पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो”

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन!

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More