बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बॅचलर राहु नका, घरात बायको असली की माणसाचं डोक शांत राहतं”

मुंबई | एआयएमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (AIMIM Chief Asaduddin Owaisi) यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना बॅचलर मुलांच्या बाबतीत एक वक्तव्य केलं आहे. ते सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना राजकीय धर्मनिरपेक्षतेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

‘लग्न करणार ना? बॅचलर राहु नका. बॅचलर फार त्रास देत आहेत. बायको घरात असली की, माणसाचं डोक शांत राहतं. जे तरूण 18-19 वर्षांचे आहेत त्यांचं लवकरच लग्न होईल, त्यांना मुलेही होतीलं’, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित तरूणांना तुमच्या मुलांना हक्क मिळू नयेत असं तुम्हाला वाटतं का?, असा प्रश्न केला आहे.

यावेळी बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी धर्मनिरपेक्षतेपासून मुस्लिमांना काय मिळालं? असा प्रश्न करत धर्मनिरपेक्षता शब्दाने मुस्लिमांचे नुकसान झालं. तसेच महाराष्ट्रात केवळ 22 टक्के मुस्लिम प्राथमिक शाळेत प्रवेश घेतात. महाराष्ट्रातील 83 टक्के मुस्लिम भूमिहीन आहेत, असं असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितलं. काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं ह्रदय केवळ मराठा समाजासाठी धडकत का? असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांनी केला.

दरम्यान, सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीने मुस्लिम समाजाचा केवळ व्होट बॅंक म्हणून वापर केला. मुस्लिमांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पुर्ती आजपर्यंत झाली नाही. तसेच खासदार इम्तियाज जलील(MP Imtiaz Jalil) यांनी वक्फ बोर्ड जमिन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“पवार साहेबांनीच शेतकऱ्यांना हमीभाव दुप्पट चौपट करून दिला”

“राजकारणात असूनही हवेत गप्पा न मारणारे नेते म्हणजे शरद पवार”

धक्कादायक! एकाच दिवसात घेतली तब्बल ‘इतक्या’ वेळा कोरोना लस

“गोपीनाथ मुंडेंच्या तोडीचा एकही नेता आज भाजपत नाही”

“विवाहबाह्य लैंगिग संबंध ठेवणे म्हणजे गंभीर पाप नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More