देश

महाआघाडीला घाबरण्याची गरज नाही, निवडणूक जिंकण्याची जबाबदारी माझी!

लखनऊ | महाआघाडीला घाबरण्याची गरज नाही. निवडणूक जिंकण्याची जबाबदारी माझी आहे, असं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते उत्तरप्रदेशमधील कार्यसमितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलत होते.

येत्या लोकसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील योगी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम तुम्ही सर्वांनी करा, असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितल्याचे समजते.

दरम्यान, उत्तरप्रदेशातील पश्चिमेकडील मेरठ हे मोठे राजकीय केंद्र आहे. तब्बल 12 वर्षांनी येथे भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची विष घेऊन आत्महत्या!

-निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्येच बिनसलं; मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

-मुख्यमंत्र्यांनी चक्क गुडघाभर चिखलात उतरून लावला भात!

-धनगर आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या!

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कुटुंबातील प्रत्येकाला दीड लाखाची कर्जमाफी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या