बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘झिका व्हायरसमुळे घाबरून जाऊ नका’; आरोग्यमंत्री राजेश टोपेेंचं जनतेला आवाहन

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं पुणेकरांना दिलासा मिळाला होता. सर्व काही सुरळीत होत असताना आता पुण्यात आणखी एका व्हायरसने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात झिका व्हायरसचा शिरकाव झाल्यानं आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुण्यातील एका महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे.

झिका व्हायरसमुळे राज्यातील जनतेने घाबरून जाऊ नये. अद्याप या आजाराचं संक्रमण झालेलं नसून आजाराला प्रतिंबध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत उपाययोजना सूरू आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. केंद्र सरकारच्या तीन सदस्यांचं पथक सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहे. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणी नष्ट केली जात आहेत. तर काहींवर लक्षणानुसार उपचार केले जात असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय पथक पुण्यात दाखल झालं. हे पथक आरोग्य विभागातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर बेलसर गावात जाण्याबाबत निर्णय घेणार आहे. आरोग्य यंत्रणेने बेलसरसह अन्य 5 गावात सर्वेक्षण सुरू केलं. त्यावेळी केंद्रीय यंत्रणा देखील देशात झिका व्हायरस पसरत असलेल्या शहरांवर नजर ठेऊन होती.

दरम्यान, राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या चार जिल्ह्यात पाॅझिटिव्हीटी दर जास्त असल्यानं लसीकरण प्रक्रियेवर भर दिला जात असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या जिल्ह्यात जास्तीचे लसीकरण करण्यावर भर देण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आल्याचं टोपेंनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अबब! प्रियांकाच्या अमेरिकेतील रेस्टॉरंटमधील मुंबई वडापावची किंमत ऐकून थक्क व्हाल

गरीब घरातला श्रीमंत माणूस; नाव न सांगण्याच्या अटीवर पांडुरंगाचरणी 1 कोटींचं दान!

’15 दिवस धोक्याचे’; केंद्राकडून राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना

41 वर्षांनंतर हाॅकी संघानं रचला इतिहास; रोमांचक सामन्यात भारताचा दणदणीत विजय

मी चुकीचा होतो तर, केंद्रावर ही वेळ का आली?- अशोक चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More