बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर महाविकास आघाडी स्थापन करण्याची गरज नसती पडली’, उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावरचा राग मुंबईकरांवर नको, पर्यावरणाची हानी करू नका, असं  उद्धव ठाकरे म्हणाले.

पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तीन मुद्दे मांडले. हेच जर अडीच वर्षापूर्वी केलं असत तर त्यावेळी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याची गरज नसती पडली, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

आरेचा निर्णय बदलावा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. आरेचा प्लॉट कुणाचा खासगी नाही. मी पर्यावरणाच्या बाजूने आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा निर्णय घेऊ नका. याचं मला दु:ख होत आहे, अशी खंत देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

लोकशाहीचे चार स्तंभ न्यायपालिका ,कार्यकारी मंडळ, प्रसारमाध्यमे आणि विधिमंडळ यांनी लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर लोकांचा लोकशाही वरून विश्वास उडेल, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. तर या सगळ्या घडामोडीवेळी लोकांनी मला खूप प्रेम दिलं त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे, असंही ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या 

‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल…’, शिंदे सरकारमध्ये शहाजी पाटलांना मंत्रीपद मिळणार ?

‘तुमच्यामुळे देशाची बदनामी झाली, टीव्हीवर येऊन माफी मागा’; नुपूर शर्मांना सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं

‘हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही’; उद्धव ठाकरे अखेर स्पष्टच बोलले

“जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचं आणि आपल्याच…”

मोठी बातमी! सत्तेत येताच ठाकरे सरकारचे दोन निर्णय शिंदे-फडणवीसांनी बदलले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More