बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मीडियावाले उगीच कंड्या पिकवू नका’; फडणवीसांनी माध्यमांना फटकारलं!

पुणे | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नेत्यांच्या भेटीगाठींचा वेग वाढला आहे. राज्यातील भाजपचे अनेक बडे नेते दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेत आहेत. दिल्लीत वाढलेल्या भाजप नेत्यांच्या भेटीगाठींमुळे येत्या काही दिवसात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलू शकतात, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र, आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत वायफळ चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसेच फडणवीसांनी यावेळी माध्यमांना देखील फटकारलं आहे. मीडियावाले उगीच कंड्या पिकवू नका, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

आमचे प्रदेशाध्यक्ष चांगलं काम करत आहेत. तुम्ही मीडियावाले उगीच कंड्या पिकवू नका. बातम्या कमी पडत असतील तर मला बातम्या मागा. मी देत जाईल, असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतर चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

दरम्यान, भाजपमध्ये सध्या तरी कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. केंद्रातील नवीन मंत्र्यांच्या भेटी घेण्यासाठी पाटील दिल्लीत गेले आहेत. मात्र, या कारणाने पतंगबाजी करुन चुकीच्या बातम्या पसरवू नका, असं देखील फडणवीसांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनाचा कहर! आणखी एक नवा व्हेरिएंट आला समोर

खुशखबर! पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता ‘या’ तारखेला मिळणार

एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे, नीरजकडून ऑलिम्पिक पदक मिल्खा सिंग यांना समर्पित!

“जाऊ तिथं खाऊ असं महाविकास आघाडी सरकारचं काम”

नरेंद्र मोदींचा नीरज चोप्राला फोन, कौतुक करत फोन ठेवताना म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More