बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राणेंच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, वेळ आली की कुंडली बाहेर काढू”

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. कोकणात या दोन्ही नेत्यांमध्ये सतत शाब्दिक वाद रंगलेला असतो. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी कोकणाच्या विकासात विनायक राऊत यांची काहीच भूमिका नाही, असं म्हटलं होतं. आता विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मी नारायण राणे यांच्या धमक्यांना घाबरत नाही. प्रहारच्या माध्यमातून काय बाहेर येणार आहे ते पाहून घेऊ, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत. राणेंच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, वेळ आली की राणेंची कुंडली बाहेर काढू, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

राणे हे स्वत:चं चिखलात बुडालेले आहेत. आम्हीही त्यांचा रक्तरंजित इतिहास बाहेर काढू, असा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी केला आहे. परिणामी नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हं आहेत. नारायण राणे आणि विनायक राऊत कोकणाच्या विकासावरून अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसून आलं होतं.

दरम्यान, विनायक राऊत हे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते. मुंबई-गोवा महामार्गावरून नारायण राणे यांनी शिवसेेनेवर जोरदार टीका केली होती.

थोडक्यात बातम्या 

मोठी बातमी! प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये अटक; कलम 144 लागू

“मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता, मेलो तरी त्यांना सोडणार नाही”

‘शशिकांत शिंदेंना भाजप 100 कोटींची ऑफर देईल असं मला वाटत नाही’; प्रविण दरेकरांचं शिंदेंना प्रत्युत्तर

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

‘आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहिली, तुमचं हे काय चाललंय?’; न्यायालयाने योगी सरकारला फटकारलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More