बाबारे, धोनीची नक्कल करु नकोस; ऋषभ पंतला दिग्गजांचा सल्ला

मुंबई | संघात नव्याने पदार्पण केलेला ऋषभ पंत सध्या विकेटकिपरचा रोल निभावत आहे. त्याच्या विकेटकिपींगच्या फुटवर्कबाबत माजी क्रिकेटपटूंनी चिंता व्यक्त केली आहे. 

ऋषभला विकेटकिपींगमधील प्राथमिक गोष्टी शिकणे आवश्यक आहे, असं मत भारताचे माजी विकेटकिपर सईद किरमानी यांनी व्यक्त केलं आहे. 

ऋषभ विकेटकिपींग करताना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं अनुकरण करतो. धोनीचं तंत्र हे खुप वेगळे आहे. त्यामुळे नव्याने आलेल्या ऋषभने त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला किरमानी यांनी दिला आहे. 

दरम्यान, ऋषभने इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्याने या सामन्यात 24 धावा केल्या होत्या. तसंच याच सामन्यात त्याने 7 झेलही घेतले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोठी बातमी | नाना पाटेकरांसह सारंग, आचार्य, सिद्दकींविरोधात गुन्हा दाखल

-#MeToo मुळे विकृत संस्कृती उदयाला येऊ शकते- शिवसेना

-गायक कैलाश खेरवर गंभीर आरोप; माझ्या मांडीवर हात ठेवला अन्…

-दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत- जयंत पाटील

-अनुपची अग्निपरिक्षा; ज्यांच्यासाठी खेळला आता त्यांच्याच विरोधात खेळणार