बुमराहसारखी मर्यादा ओलांडू नका, वाहतूक पोलिसांची शक्कल

Photo- Jaipur Traffic Police

जयपूर | बुमराहने मर्यादा ओलांडल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला मोठा फटका बसला. याचाच आधार घेत जयपूर वाहतूक पोलिसांनी रस्ते वाहतुकीसाठी नवे मार्गदर्शक फलक बनवले आहेत. 

मर्यादा ओलांडू नका, तुम्हाला माहितीये हे महागात पडू शकतं, असं सांगून लाईनच्या आत उभ्या राहिलेल्या वाहनांसोबत बुमराहचा नो बॉलचा फोटोही लावण्यात आलाय. 

जयपूर वाहतूक पोलिसांनी यासोबतच आणखी नाविन्यपूर्ण मार्गदर्शन फलक बनवले आहेत. ते ट्विटरवर ट्विटही केले आहेत. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या