Top News देश

“लस देताना सामान्य आणि व्हिआयपी असा भेदभाव नको, सर्वांचाच जीव सारखाच”

नवी दिल्ली |  दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशात कोरोनाची लस देताना सामान्य आणि व्हिआयपी असा भेदभाव केला जाऊ नये, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडले आहे.

केजरीवाल म्हणाले की, “सर्वांचाच जीव महत्वाचा आहे, त्यामुळे लस देताना सामान्य आणि व्हिआयपी असा फरक केला जाऊ नये. कोरोनाची लस देताना कोरोना योद्ध्यांना प्राधान्या द्यायला हवे. त्यांच्यानंतर जेष्ठनागरीक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल  नागरिकांना प्राधान्य द्यायला हवे”.

कोरोनावरील लशींचं वितरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना तयार केली जाऊ शकते.

दिल्ली सरकार मात्र, राजकीय विचार न करता तांत्रिकदृष्ट्या आणि प्राथमिकतेच्या आधारावर कोरोनावरील लशींचं वितरण करण्यास प्राधान्य देईल, असंही केजरीवाल यांनी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘ही’ गोष्टी शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; काँग्रेस नेत्याची टीका

आयसीसीचा मोठा निर्णय! ‘या’ वर्षाखालील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?; आशिष शेलारांचा सवाल

“मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नितीन राऊतांनी बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावं”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या