बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना काळात राजकारण करू नका, पक्ष विसरून मदत करा’; गडकरींनी टोचले भाजप कार्यकर्त्यांचे कान

नागपूर | कोरोना संकटाच्या काळात अनेकजण पुढाकार घेत गरजूंना मदत करत आहेत. यामध्ये अनेक नेते, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. मात्र काहींना मात्र मदत केल्यावर त्याचा दिखावा करण्याची सवय असते. याचाच धागा पकडत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.

कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही. अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करू नका.  एकाच ऑक्सिजन सिलेंडर 4 जण फोटो काढतात हे चांगले नाही. त्यातून आपल्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतो, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे. हा खरा राजकारणाचा अर्थ असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. नागपूर भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

दरम्यान, नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच त्याचा भाग नाही, यावेळी गरिबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरून मदत करा. त्याचे फळ पक्षाला नक्की मिळतं. वाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधीच विसरत नाही, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मालदीवमध्ये दारु पिऊन वॅार्नर आणि स्टेलर यांच्यात जोरदार हाणामारी?, स्टेलरनं दिलं स्पष्टीकरण

“मदतीची विमानेच्या विमाने येत आहेत, ती नेमकी कुठे जात आहेत याचा खुलासा केंद्राने करावा”

“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”

जगप्रसिद्ध ‘लॅन्सेट’चा कोरोनाबद्दल धक्कादायक दावा, मोदी सरकारवर जोरदार टीका

पंढरपूरच्या निवडणुकीनं घात केला, कोरोनानं एकाच कुटुंबातील चौघांचा बळी घेतला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More