बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका; स्वत: ठोकर खाल्लेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | प्रेम एक सुखद स्पर्श आणि अनंत काळ टिकणारी भावना आहे. प्रेमाला कोणतीही बंधन नसतात. पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती खरचं आपल्या सोबत कायम राहिल का? असा एकदा तरी विचार करण्याचा सल्ला अभिनेत्री निना गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत नीना गुप्ता यांनी विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला आहे. महत्त्वाचं  म्हणजे त्यांनी त्याठिकाणी स्वतःचा अनुभव सांगितला आहे.

जेव्हा एखादा विवाहीत व्यक्ती कोणत्या महिलेसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो म्हणतो माझं आणि माझ्या पत्नीचं पटत नाही आणि आपण त्यांना पत्नीपासून विभक्त होण्याचा सल्ला देतो. पण तेव्हा हे पुरूष त्यांच्या मुलांचं कारण पुढे करतात. सुरुवातीची ओळख, त्यानंतर प्रेमात पडणं. फिरायला जाणं, एकत्र वेळ व्यतीत करणं इथपर्यंत हे नातं येऊन पोहोचतं. पुढे अर्थातच अपेक्षा वाढतात आणि तुम्ही जेव्हा ‘त्या’ व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करता तेव्हा मात्र, त्याचं उत्तर तुम्हाला हादरवणारं असतं.

लग्नाचा विषय  निघाला तर तो पुरूष पाठ फिरवतो. म्हणतो मी या सर्व गोष्टी करू शकत नाही. आपलं जे काही आहे ते  इथेचं थांबवूया. तो पुरूष तुमच्यासोबत राहण्यास नकार देतो, तेव्हा तुम्ही काय कराल?

दरम्यान, या सर्व परिस्थितींचा अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतला आहे. त्यामुळे निना गुप्ता यांनी लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका असा सल्ला दिला आहे. खासगी आयुष्यात नीना गुप्ता यांनी काही आव्हानांचा सामना केला आहे. पण, या आव्हानांनी खचून न जाता त्यांनी मोठ्या धीराने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

थोडक्यात बातम्या – 

‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, मित्राला वाचवण्यासाठी दाखवली जबरदस्त हिंमत, पाहा व्हिडिओ

‘ये तो सोची समझी चाल’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची भाजपवर टीका 

कुंपणच शेत खात असेल तर राज्यातील जनतेने कुठे न्याय मागायचा?- चित्रा वाघ

‘…त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे’; नारायण राणेंच्या आरोपाने खळबळ

धक्कादायक! नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचा वाद टोकाला, तरुणाची दगडाने ठेचून केली हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More