Top News महाराष्ट्र मुंबई

दिशाभूल करणाऱ्या कोडिंगच्या जाहिरातींना बळी पडू नका- वर्षा गायकवाड

मुंबई | सहावी इयत्तेपासून कोडिंग अनिवार्य असं सांगणारी एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. याद्वारे हजारोंचे शुल्क उकळण्याचा प्रकार सुरु आहे. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाष्य केलंय.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आणि राज्य शासनाकडून असा कोणताही निर्णय अद्याप झाला नसून पालक, विद्यार्थ्यांनी अशा जाहिरातींना बळी पडू नये, असं आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी अशा तक्रारींची दखल घेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना टॅग करून यासंदर्भात स्पष्टीकरणाची विनंती केली. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हे आवाहन केलंय.

महत्वाच्या बातम्या-

राज्यात उद्या, परवा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही”

“मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीतून केलं ट्विट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या