बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमचे आवडते मुख्यमंत्री पाचव्या नंबरवर आहेत हे विसरु नका”

मुंबई | प्रश्नम या संस्थेने देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केलं आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमध्ये अव्वल मुख्यमंत्री ठरले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पावर यांनी भाजपला टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. ‘प्रश्नम’ या संस्थेने देशातील 13 राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन, असं म्हणत रोहित पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच कौतुक केलं आहे.

भाजप नेते दरवेळी उत्तर प्रदेशचं कौतुक करत असतात. पण केलेल्या सर्वेक्षणात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पाचवा नंबर आहे. हे भाजपने विसरु नये, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे मविआ सरकारचं यश आहे. उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, ‘प्रश्नम’संस्थेकडून देशातील 13 राज्ये निवडण्यात आली होती. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश करण्यात आला होता.

 


थोडक्यात बातम्या-

आंगावर काटा आणणारा व्हिडीओ, हात निसटला अन् ती थेट 9व्या मजल्यावरुन खाली कोसळली

“काँग्रेस स्वबळाची भाषा करत असेल, तर दुसऱ्यांनी पोटात दुखवून घेण्याचं काय कारण”

करीना कपूरचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात, बीडमध्ये तक्रार दाखल

“बैलगाडीवरून कोसळलात तसे सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं”

मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More