Top News देश

“राजकारणात येण्यासाठी दबाव टाकून मला वेदना देऊ नका”

नवी दिल्ली | ज्येष्ठ अभिनेते आणि सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणी केली होती. नववर्षाच्या मुहूर्तावर आपल्या पक्षाची घोषणा ते करणार होते. परंतू त्यांची अचानक प्रकृती बिघडली त्यानंतर त्यांना रूग्णालयात नेण्यात आलं होतं.

रजनीकांत यांनी रूग्णालयातून घरी आल्यावर आपल्या प्रकृतीचं कारण देत राजकारणात येणार नसल्याचं सांगितलं. मात्र त्यांच्या चाहत्यांनी रजनीकांत यांनी राजकारणात सहभागी होण्याचा आग्रह करत निदर्शन केली आहेत. याच पार्श्वभूमीनप रजनीकांत यांनी चाहत्यांना आवाहन केलं आहे.

राजकारणात येण्याचा निर्णय मी का रद्द केला हे मी आधीच स्पष्ट केलं आहे. कृपा करून माझ्यावर राजकारणात येण्यासाठी दबाव टाकू नका. मला वेदना देऊ नका, असं भावनिक आवाहन रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांना केलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, रजनीकांत राजकारणात येणार नसतील तर आम्ही येणा-या निवडणुकांमध्ये मतदान करणार नाही, अशी भूमिका काही चाहत्यांनी घेतली आणि निदर्शन केलीत. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या रजनीकांत यांनी चाहत्यांना भावनिक आवाहन केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

अमिताभ बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मलाच कॉपी केलं जातं- कंगणा राणावत

बर्ड फ्लूचं संकट मोठं आहे, सरकारने व्यावसायिकांना मदत करावी- देवेंद्र फडणवीस

‘…अन्यथा आम्ही कृषी कायद्यांवर बंदी घालू’; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

“मोदींनी पक्ष्यांना दाणे खायला घातल्याने पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले”

“बर्ड फ्ल्यू माणसांनाही होऊ शकतो, काळजी घ्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या