नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशातील एकूण कोरोना रूग्णसंख्येने चार कोटींचा टप्पा पार केला असून कोरोना व्हायरसच्या लक्षणांत देखील गंभीर स्वरूपाचे बदल पाहायला मिळत आहेत.
कोरोना व्हायरसच्या बदलत्या व्हेरिएंट्समुळे कोरोनाच्या लक्षणात देखील झपाट्याने बदल होत आहेत. आता केवळ सर्दी आणि खोकला नाही तर कोरोना शरीराच्या प्रत्येक अवयवांवर देखील परिणाम करत आहे. तर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम हा ह्रदयावर होत आहे. कोरोनामुळे ह्रदयाचे ठोके अनियमीत होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
कोरोनातून बरे झाल्यानंतर काही आठवड्यांनी अंगावर पित्ताच्या गाठी उठत असून शरीराचा रंग बदलत आहे. तसेच कोरोनामुळे डोळ्यांना प्रकाशाचा त्रास होणे, डोळे दुखणे किंवा गुलाबी होणे, डोळ्यात पाणी येणे हे दिर्घकाळ लक्षणं आढळून येत आहेत.
दरम्यान, वास किंवा चव घेण्याची क्षमता कमी होणे, केस गळणे, पोटाशी संबंधित समस्या, ही देखील कोरोनाची दिर्घकाळ लक्षणं आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणतीही दिर्घकाळ लक्षणं आढळली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
थोडक्यात बातम्या-
उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात जाणार?
बसा बसा म्हणत फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं, पाहा व्हिडीओ
नासक्या भाजीची उपमा देत गुलाबराव पाटील संजय राऊतांवर बरसले, म्हणाले…
महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी!
“माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला हवी”
Comments are closed.