बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुमचेही केस गळतात का? मग ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

मुंबई | आजकालच्या काळात केस गळती (Hair Fall) ही एक मोठी समस्या बनली आहे. वाढते प्रदुषण (Pollution) म्हणा किंवा बदलती जीवनशैली (Change In Lifestyle) या गोष्टींना केसगळतीसाठी जबाबदार मानलं जातं. पण अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे केसगळतीची समस्या उद्भवते.

थाईरॉईडचा (Thyroid) त्रास असेल तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात केस गळती होते. हायपोथाईरॉईडीझम किंवा हायपरथाईरॉईडीझमचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचे उपचार घ्या. तसेच गर्भधारणेदरम्यान होणारे हार्मोनल बदलही केसगळतीसाठी कारणीभूत ठरतात.

आहारातील निष्काळजीपणा, शरीरात लोहाची कमतरता, मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव यामुळेही केस मोठ्या प्रमाणात गळतात. आहारात पुरेसे जीवनसत्त्व, लोह यांचा समावेश केला तर नवीन केस यायला मदत होते. रजोनिवृत्तीवेळीही अनेक हार्मोनल बदल होतात, त्यामुळेही केस गळती होते.

वजन कमी करण्यासाठी अती प्रमाणात डायटिंग केल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता जाणवते आणि केस गळायला सुरूवात होते. वजन कमी करण्यासाठी डायटिंग करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्याची सवय लावून घेतली तर केस गळतीची समस्या कमी होते.

थोडक्यात बातम्या-

Omicron रूग्णांमध्ये सापडतात ‘ही’ एकसारखी लक्षणं; तज्ज्ञांकडून गंभीर इशारा

“जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय हे कसं समजणार?”

‘माझ्यावरचे ‘ते’ आरोप बिनबुडाचे’, कंगनाची उच्च न्यायालयात धाव

बर्ड फ्लूचं सावट; सरकारनं दिले बदक आणि कोंबड्या मारण्याचे आदेश

“बाबरीच्या निकालानंतर आम्ही पार्टी केली, वाईनची बॉटल घेतली आणि…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More