बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकारची प्रतिमा जपण्यासाठी सर्वांना समोर येऊन बोलावं लागेल, हे 8 दिवसात पळून जातील”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास अघाडी सरकारच्या नेत्यांना चांगलंच खडसावलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते विरोधकांना प्रत्युत्तर देत असल्याने संजय राऊत संतापले आहेत. केवळ खुर्चीवर बसू नका तर हल्लाबोल करा, असं आवाहन संजय राऊत यांनी महाविकास अघाडी सरकारच्या नेत्यांना केलं आहे.

विरोधकांनी टीका केल्यानंतर केवळ शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि मीच बोलणार का?, असा सवाल संजय राऊतांनी मविआ सरकारच्या नेत्यांना केला आहे. यावेळी मंत्र्यांनी केवळ खुर्चीवर बसू नये तर हल्ल्यांवर प्रतिहल्ला करावा, असं आवाहान संजय राऊतांनी मंत्र्यांना केलं आहे.

जे जे खुर्चीवर बसलेत त्यांनी सरकारची प्रतिमा जपण्यासाठी समोर आलं पाहिजे, ती त्यांची जवाबदारी आहे, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते बोलले तर विरोधक 8 दिवसांत पळून जातील, असं देखील संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अनेक मुद्दांवर भाष्य केलं आहे. तसेच विरोधकांवर देखील जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या, नरेंद्र मोदी तसेच ईडी आणि सीबीआयला देखील धारेवर धरलं आहे .

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील उपायुक्तांचं भांडं फुटलं, घरात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं!

“काश्मीर बिहारींना सोपवा, 15 दिवसांत सुधारुन दाखवू”

“येत्या 15 दिवसांत भाजपचे 6 आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा ताजे दर

“नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय, कोणी किती महसूल गोळा केला हे येईल समोर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More