“नवाब मलिकांचा अनिल देशमुख होऊ देऊ नका”
पुणे | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीवरुन राज्यातील वातावरण चांगलंच पेटल्याचं पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच मलिकांच्या ईडी चौकशीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख यांच्याबाबतीतही सुरुवातीला आरोप फेटाळले नंतर त्यांचा आवाज क्षीण झाला. आता अनिल देशमुख कोण असा प्रश्न ते आपापसात विचारत आहेत. तसंच आता होऊ देऊ नका, असं टीकास्त्र चंद्रकांत पाटील यांनी सोडलं आहे.
कर नाही त्याला डर कशाला, ईडीची चौकशी आली तर घाबरता कशाला, त्यांनी चौकशीला सामोरं जावं, त्यांचा दोष नसेल तर न्यायालय त्यांच्या बाजूने निर्णय देईल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी ईडीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
नवाब मलिकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन
“नवाब का ‘नक़ाब’ उतरेगा और मलिक का ‘मालिक’ बेनक़ाब होगा”
‘भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला’, भाजपचा हल्लाबोल
“भाजपने स्वतःचा ईडी चालवायला माणूस ठेवला असेल”
“प्रत्येकाला देशासाठी कुर्बान व्हावं लागेल, आता हौतात्म्य आलं तरी चालेल”
Comments are closed.