बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याचं नाशिक होऊ देऊ नका- महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे | पुणे शहराताही कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहेच त्यासोबतच मोठी समस्या आहे ती म्हणजे ऑक्सिजन कमी पडत आहे. त्यामुळे आता नवीन कोरोनाधितांना ऑक्सिजन मिळणं अवघड आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारला आवाहन केलं आहे.

ऑक्सिजन किंवा रेमडेसिविर यांच्या पुरवठ्याची जबाबदारी ज्यांच्याकडे असेल ती त्यांनी पूर्ण क्षमतेने उभी करावी. या संबंधीची भावना आम्ही राज्य सरकारकडे केली आहे राज्य सरकारने पुण्याचे नाशिक होऊ देऊ नये असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. पुण्यातील कोरोना स्थितीवर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पुणे शहरात खासगी व सरकारी हॉस्पिटल मिळून साधारण 250 मेट्रिक टन ऑक्सिजन रोज पुण्याला लागतो. मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून त्यात कमतरता निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक रुग्णालयातील गंभीर रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवावं लागत आहे. पण आता पुरेसा साठा ऑक्सिजनचा निर्माण झाल्याशिवाय ऑक्सिजन बेड सुरू करणे शक्य नसून ही परिस्थिती भीषण आहे.

दरम्यान, नाशिकमधील महानगरपालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना आज घडली. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ऑक्सीजन गळतीमुळे निष्पाप लोकांचा जीव गेल्याने आक्रमक होत महानगरपालिकेच्या आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्र्यांचा ॲानलाईन संवाद रद्द, संपूर्ण लॅाकडाऊनसंदर्भात नवी माहिती आली समोर

“दिल्ली मरतेय, थोडीतरी लाज असेल तर राजीनामा द्या”

“कुणी कितीही आपटा संजय काकडे सापडणार नाही”

“कोरोनाची दुसरी लाट आणि त्या लाटेचं व्यवस्थापन ही मोदी निर्मित ट्रॅजेडी”

“नाशिक महापालिका आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More