बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुलांच्या मनात एकमेकांच्या द्वेषाच विष पसरवू नये, भेदाभेद करणारे…”

पुणे | गेल्या काही दिवसांपासून देशात हिजाबवरून वाद सुरू आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी पुणे विद्यापीठामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. त्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशातील वाढणाऱ्या विषमतेवर टीका केली आहे.

शिक्षण क्षेत्रात मग ते शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ असो दोन्हीकडील लोकांनी आपल्या मुलांच्या मनात एकमेकांविषयी विष पसरवू नये. विद्यार्थ्यांना यापासून दूर ठेवलं पाहिजे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच महात्मा फुले यांनी धर्म, राज्य, भेद असता कामा नये, असं म्हटलं होतं. सर्वांनी शांततेत एकत्र राहिलं पाहिजे आणि समाजाची देशाची प्रगती करायला हवी, असं महात्मा फुले यांनी आम्हाला शिकवलं आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

कोरोनाचा संसर्ग आता कुठे नियंत्रणामध्ये येऊन शाळा महाविद्यालय सुरू होत आहेत. अशावेळी आपण मुलांना काय शिकवतो? या वयात मुलांच्या मनात अशाप्रकारचे भेदाभेद, राग, द्वेष निर्माण केला तर  मग शिक्षणाचा काय फायदा?, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी केला आहे. अशा प्रकारचे वाद वाढणार असतील तर ही चिंतेची बाब आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भेदाभेद करणारे राजकारणीच जास्त असतात. सर्व राजकारण्यांना आवाहन आहे की, विद्यार्थ्यांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होता कामा नये, असं आव्हानही छगन भुजबळ यांनी केला आहे. दोन्हीकडील लोकांनी आपल्या मुलांच्या मनात एकमेकांविषयी द्वेषाच विष पसरवू नये, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक मुद्दे उपस्थित केले जातात, असं छगन भुजबळ म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणत मनसेजी बॅनरबाजी, सोशल मीडियावर एकच चर्चा

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे नवे निर्देश, अशी असेल नियमावली

valentine Day: ‘तू माझा आहेस’; म्हणत मलायकानं शेअर केला ‘तो’ फोटो

IPl Auction 2022: आयपीएल लिलावात कोणत्या संघानं मारली बाजी, माजी क्रिकेटपटू म्हणतात…

कुडाळ परिसरात शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये धक्काबुक्की, पोलीस घटनास्थळी दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More